समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल, असे बावनकुळेंनी सांगितले.
२२व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू आहे.
(हेही वाचा – महापालिकेतील ११३ समुदाय संघटकांच्या पदांची भरती लटकलेलीच!)
‘हा’ अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला
भाजपा-सेना युतीमध्ये कोण लढणार हे ठरविण्याचा अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे समन्वय करतील. स्थानिकांना काहीच ठरविण्याचा अधिकार नाही. भाजपा सेना युती विचारांची आहे त्यामुळे ती एकत्र राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांचा विचार वेगळा आहे. तेथे तीन तिघाडा काम बिघाडा होणार आहे, असे बावनकुळेंनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community