Union Budget 2024 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ७५४५ कोटींची तरतूद; अर्थमंत्र्यांची घोषणा

116
Union Budget 2024 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ७५४५ कोटींची तरतूद; अर्थमंत्र्यांची घोषणा

वर्ष २०२४-२५ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Union Budget 2024)

संसेदचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी २२ जुलै पासून सुरू झाला आहे. वर्ष २०२४-२५ साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या विकासासाठी व देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. (Union Budget 2024)

(हेही वाचा – Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा टेक ऑफ करताना भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती)

महाराष्ट्राच्या विविध पायाभूत प्रकल्पांसाठी केली गेली रूपये ७५४५ कोटी रूपयांची तरतूद

महाराष्ट्राच्या तेरा पायाभूत प्रकल्पांसाठी आजच्या अर्थसंकल्पात रूपये ७५४५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, राज्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प ठरेल. यामध्ये विदर्भ-मराठवाडा दुष्काळग्रस्त सिंचन प्रकल्पांसाठी रूपये ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यासोबतच, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार प्रकल्पांतर्गत रूपये ४०० कोटी रूपयांची, सर्वसमावेशक विकासकामांसाठी (इकॉनॉमिक कॉरिडॉर) या प्रकल्पासाठी रूपये ४६६ कोटी, पर्यावरणपूरक शाश्वत पर्यावरणपूरक कृषि प्रकल्पासाठी रूपये ५९८ कोटी, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी रूपये १५० कोटी (केंद्र शासनाकडून मिळणारा वाटा), मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी ९०८ कोटी, मुंबई मेट्रो साठी १८७ कोटी रूपये, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी रूपये ४९९ कोटी, मुंबई महानगर प्रदेश हरित शहरी गतिशीलता प्रकल्पासाठी रूपये १५० कोटी, नागपूर मेट्रो साठी रूपये ६८३ कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी रूपये ८१४ कोटी, नाग-नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ५०० कोटी तर मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी रूपये ६९० कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार, विशेषतः ग्रामीण रस्ते सुधार, मेट्रो प्रकल्प, औद्योगिक कॉरिडॉर आणि नदी पुनरुज्जीवन यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल. (Union Budget 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.