Union Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर

53
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) देशाचे बजेट (Union Budget 2025) सादर करत आहेत. कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करत आहेत. सीतारमण यांनी संसदेत एक मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्डची (Kisan Credit Card limit increased) मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर करण्यात आली आहे. (Union Budget 2025)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, “किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली जात आहे. किसान क्रेडिट कार्ड असलेल्या ७.४ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. पुढील ६ वर्षांत मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. कापसाचे उत्पादन वाढवण्याचे ५ वर्षांचे ध्येय आहे. यामुळे देशाचा वस्त्रोद्योग बळकट होईल. छोट्या व्यावसायिकांना विशेष क्रेडिट कार्ड दिले जातील. सुरुवातीला १० लाख कार्ड जारी केले जातील.” (Union Budget 2025)

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा मोठा फायदा

किसान क्रेडिट कार्ड योजना जवळपास 26 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. या योजनेचा 1998 मध्ये श्रीगणेशा करण्यात आला होता. या योजनेत शेतकऱ्यांना शेतीसंबंधीत कामासाठी 9 टक्के व्याजाने अल्प कालावधीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सरकार कर्जावरील व्याजात 2 सवलत पण देते. तर जे शेतकरी वेळेत कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून 3 टक्के सवलत देण्यात येते. म्हणजे मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे कर्ज वार्षिक केवळ 4 टक्के व्याज दराने देण्यात येते. 30 जून 2023 पर्यंत असे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 7.4 कोटींहून अधिक होती. त्यांच्यावर 8.9 लाख कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज होते. (Union Budget 2025)

गेल्या वर्षी इतके क्रेडिट कार्ड वाटप
बँका आणि ग्रामीण वित्तीय संस्थांच्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे वाटप होते. NABARD च्या डाटानुसार, ऑक्टोबर 2024 पर्यंत सहकारी बँका आणि विभागीय ग्रामीण बँकांनी देशभरात 167.53 लाख किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले होते. त्यांची एकूण क्रेडिट मर्यादा 1.73 लाख कोटी रुपये होती. दूध डेअरीसंबंधीत शेतकर्‍यांना 11.24 लाख कार्ड देण्यात आले आहे. (Union Budget 2025)

या घटकांवर मोदी सरकारचे लक्ष
बजेट 2025 मध्ये खासकरून गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या विकासावर भर देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यानुसार, विविध योजना या घटकांच्या अवतीभवती असतील. जुन्या योजनांची मर्यादा वाढवण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. तर महिलांची अनेक स्टार्टअप्स आणि लघु, मध्यम उद्योगातील सक्रियता वाढवण्यासाठी या बजेट भाषणात घोषणांचा पाऊस पडत आहे. एकामागून एक घोषणा होत आहे. (Union Budget 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.