Union Budget 2025 : निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त

107
Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?
Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) देशाचे बजेट (Union Budget 2025) सादर करत आहेत. कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करत आहेत. सीतारमण यांनी संसदेत एक मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल करण्यात आला असून 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त (Income tax) करण्यात आलं आहे. (Union Budget 2025)

टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली
निर्मला सीतारमण पुढे बोलताना म्हणाल्या, “नवीन आयकर विधेयकामुळे (New Income Tax Bill) गुंतागुंत कमी होणार आहे. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणं हे नव्या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. टीडीएसमध्ये (TDS) सुलभता आणणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली जाईल. अपडेटेड आयकर विवरण पत्र भरण्याची मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवली. 4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरू शकता.” (Union Budget 2025)

नवीन आयकर विधेयक आणणार
पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही. नवीन बिल म्हणजे आयकराच्या पद्धतीत बदल. (Union Budget 2025)

काय होणार स्वस्त ?
टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार, मोबाईल फोन, एलईडी, एलसीडी टीव्ही , चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार. (Union Budget 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.