केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2025 ) मांडला. यावेळी सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली ती म्हणजे प्राप्तिकराची व्याप्ती (Income tax) १२ लाख रुपयांपेक्षा जास्त करणे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. (Union Budget 2025 )
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, “विकासित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पुढील 20-25 वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत होण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. पंतप्रधान (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात आम्ही काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांवर विशेष लक्ष देण्यावर आमचा भर आहे. मध्यवर्गांसाठी काहीतरी मोठं केले पाहिजे यासाठी आधीपासून सरकारचा विचार होता. यासाठी अभ्यास करा आणि काहीतरी मोठा निर्णय मध्यमवर्गासाठी घ्या, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिल्या होत्या.” (Union Budget 2025 )
“प्रामाणिक करदात्यांकडे आमचं आधीपासूनच लक्ष होते. करदात्यांचा सन्मान करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते. यासाठी 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आयएमएफच्या दृष्टीकोणातून आपण पुढील वर्षीही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहोत. यासंदर्भात टॅक्सपेअर्सचा सन्मान राखण्यासाठी आयकर प्रस्ताव आम्ही आणला.” असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. (Union Budget 2025 )
पुढे बोलाताना त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे आयकर कमी करण्याच्या बाजूने होते, त्यांना सुरुवातीपासूनच हे हवे होते. मात्र, हे अंमलात आणण्यासाठी, आम्हाला सर्वाधिक वेळ नोकरशहांना (ब्यूरोक्रेट्स) पटवून देण्यासाठी लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयासंदर्भात सुरुवातीपासूनच स्पष्ट होते, की कर कमी करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे. पंतप्रधानांनंतर, यासंदर्भात योजना बनवणे आणि ती पुढे नेणे हे आमच्या मंत्रालयाचे काम होते. पंतप्रधानांच्या पाठिंब्यानंतर, आमच्यासमोर बोर्डाला पटवून देण्याचे आव्हान होते आणि शेवटी आम्ही आमचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडण्यात यशस्वी ठरलो.” (Union Budget 2025 )
हेही वाचा-Mahakumbh Stampede : तिसऱ्या अमृत स्नाननिमित्त पोलिस हाय अलर्टवर ; कडक तपासणी सुरू
अर्थमंत्री पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित, मागास, आदिवासी आणि सामान्य जनतेचे ऐकतात आणि त्यांच्या गरजा देखील समजून घेतात. केंद्र सरकार सर्वांसाठी काम करते आणि त्यांच्या समस्या सोडवते. अशा सरकारचा भाग असल्याचा मला अत्यंत आनंद आहे. (Union Budget 2025 )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community