-
ऋजुता लुकतुके
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करताना शनिवारी बिहारची प्रसिद्ध मधुबनी पेंटिंग असलेली साडी परिधान केली होती. अर्थसंकल्पात बिहारवर योजना आणि सवलतींचा भडिमार होता हा योगायोग नसावा. पण, अर्थमंत्र्यांच्या साडीला विशेष महत्त्व होतं. ही साडी त्यांना पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भेट केलेली होती. सफेद रंगाच्या या साडीला मधुबनी पद्धतीची पेंटिंग होती. शिवाय जरीची बॉर्डर होती. (Union Budget 2025)
२०२१ साली दुलारी देवींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचवर्षी मधुबनी इथं झालेल्या मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटच्या एका कार्यक्रमात त्यांची निर्मला सीतारमण यांच्याशी भेट झाली होती. तेव्हाच ही साडी अर्थमंत्र्यांना भेट देताना त्यांनी ती अर्थसंकल्प सादर करताना नसावी अशी इच्छा दुलारीदेवींनी व्यक्त केली होती. (Union Budget 2025)
(हेही वाचा – Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?)
Finance Minister @nsitharaman is wearing a Madhubani saree by Dulari Devi, a 2021 Padma Shri awardee.
During her visit to Madhubani for a credit outreach initiative at the Mithila Art Institute, FM spoke to Dulari Devi about Madhubani art in #Bihar. Dulari Devi gifted her a… pic.twitter.com/nkkQoBDqVQ
— DD India (@DDIndialive) February 1, 2025
सीतारमण यांनी त्याची आठवण ठेवून ही साडी शनिवारी परिधान केली. दुलारी देवी या कोळी समाजातून येतात. मधुबनी चित्रकार कर्पूरी देवी यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या ही कला शिकल्या. १६ व्या वर्षी लग्न झालेल्या दुलारी देवी यांना नवऱ्याने सोडून दिलं आहे. त्यांचं एक मुलही दगावलं. घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या दुलारी देवींनी मधुबनी पेटिंगचं स्वप्न सोडलं नाही. (Union Budget 2025)
काय आहेत वैशिष्ट्य ?
आपली इतर कामं करत असतानाच त्यांनी १०,००० च्या वर मधुबनी चित्र काढली आहेत आणि यात बाल विवाह, एड्ससारखे दुर्धर रोगांवर जागृती व महिला स्रीभ्रूण हत्या यांसारख्या विषयांवर त्या बोलत होत्या. त्यांची देशभरात ५० हून अधिक प्रदर्शनं झाली आहेत आणि आतापर्यंत १०,००० मुलांना त्यांनी या कलेचं प्रशिक्षण दिलं आहे. मधुबनीच्या प्रसार आणि प्रचारासाठी त्यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूट व सेवा मिथिला संस्था अशा सेवाभावी संस्थाही सुरू केल्या आहेत. (Union Budget 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community