Union Cabinet : महाराष्ट्रातून पटेल, शेवाळे, उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्यता

256
Union Cabinet : महाराष्ट्रातून पटेल, शेवाळे, उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला आवर घालण्यासाठी सातारा मधून खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

हिंदुस्थान पोस्टला मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नव्या सहकाऱ्यांना जोडून एनडीए आघाडीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांचे एकजुटीचे प्रयत्न सुरू असतानाच १८ जुलै रोजी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिवसेना सहभागी होण्याची शक्यता आहे. दोन्ही गट महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत आहेत. यामुळे राज्याच्या ४८ लोकसभा मतदारसंघांवर एनडीएची पकड मजबूत दिसत आहे.

(हेही वाचा – World Cup Qualifier 2023 : विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंका विजयी)

याशिवाय बिहार, यूपी आणि कर्नाटकातही जुन्या सहकाऱ्यांना परत आणण्याचे किंवा नव्या सहकाऱ्यांना जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग यांच्याशी भाजपची बोलणी सुरू आहे. यामुळे त्यांचे काका आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री पशुपतीकुमार पारस यांना मंत्रिमंडळातून माघार घ्यावी लागू शकते. बिहारमध्ये उच्च जातीय, बिगर-यादव आणि बिगर-कुर्मी ओबीसी व दलितांना जोडण्याच्या दृष्टीने दलित नेते जितनराम मांझी एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत. विकासशील इन्सान पार्टीच्या मुकेश साहनी यांना आघाडीत आणण्यासाठी बोलणी सुरू आहे. उत्तर प्रदेशात ओमप्रकाश राजभर यांची ओबीसी संघटना ‘सुहेलदेव भारतीय समाज पार्टी’ला एनडीएमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.