दिवाळीनंतर एक डोस घेतलेल्या नागरिकांना राज्यात लोकल प्रवास करण्यास मुभआ देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे राज्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. पण याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मात्र आपलं स्पष्ट मत व्यक्त केले आहे. हे निर्णय घेणे सोपे नसून केंद्राकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या भारती पवार?
हा व्हायरस किती घातक आहे याचा अनुभव सर्वच जम गेले वर्षभर घेत आहोत. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना राजकीय मतं मांडून चालत नाहीत. यावर तज्ज्ञ काम करत असतात, त्यामुळे असे निर्णय घेताना त्यांची मते महत्वाची असतात, असे भारती पवार यांनी सांगितले आहे. तसेच केंद्र सरकारकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसेच कोरोना काळात पुणे महापालिकेने केलेल्या कामाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले आहे.
(हेही वाचाः लसीचा एक डोस घेतला तरी करता येणार लोकल प्रवास? राजेश टोपेंनी दिली मोठी माहिती)
काय म्हणाले होते टोपे?
दरम्यान दिवाळीनंतर लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना सुद्धा लोकल प्रवास तसेच मॉल्समध्ये प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी रविवारी दिली होती. दिवाळीत कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घेऊनच हा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचाः आता लोकल प्रवास अजूनही झाला सोपा… राज्य सरकारचा मोठा निर्णय)
Join Our WhatsApp Community