श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एकापाठोपाठ एक नवीन खुलासे समोर येत आहे. दरम्यान, श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. श्रद्धाने पालघर पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीचा संदर्भ देत अमित शहा यांनी मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचे काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांकडून याप्रकरणाचा पाठपुरावा का करण्यात आला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. याच संदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी श्रद्धा हत्याकाडंप्रकरणावर भाष्य केले. ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल, याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष नक्की घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहांचा पोलिसांवर निशाणा
माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे, तो माझी हत्या करू शकतो, अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जाचा दाखला देत अमित शहा यांनी मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, अमित शहांनी या हत्याकांडाप्रकऱणी सवाल उपस्थित केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलिसांची चौकशी होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – सायबर पोलिसांची कारवाई; वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-यांना अटक)
श्रद्धाने पालघर पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीचा संदर्भ देत आफताब तिची हत्या करू शकतो, असे तिने पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीत म्हटले होते. तरीही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू, असा इशाराही मुंबई पोलिसांना अमित शहांनी यावेळी दिला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रार अर्जावर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली होती. मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने ही तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community