त्यावेळी भाजपाची अवस्था बिकट होती, पण… अमित शहा म्हणाले मोदींनी अशी केली आव्हानांवर मात

1987 पासून संघटनेच्या माध्यमातून लोकांमध्ये पक्षाची विश्वसनीयता कशी तयार करता येईल याचं उत्कृष्ट उदाहरण मोदींनी तयार केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातील घनिष्ठ मैत्रीचे अनेक किस्से जगाला माहीत आहेत. गुजरातमधून या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची राज्य पातळीवर सुरुवात केली आणि आता थेट केंद्रातील सत्तेत हे दोघेही देशाचं नेतृत्त्व करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी राज्य आणि आता केंद्र पातळीवर मिळून सत्तेत तब्बल 20 वर्षे अनुभवली. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील आव्हानात्मक टप्प्यांबाबत सांगितले.

(हेही वाचाः अरे व्वा! आता घरबसल्या करु शकता मतदान!)

तो काळ भाजपासाठी बिकट

भाजपामध्ये आल्यानंतर मोदींच्या आयुष्यातील घटनांचे तीन टप्प्यांत विभाजन करता येईल, असे अमित शहा म्हणाले. जेव्हा मोदी पक्ष वाढीसाठी गुजरात भाजपाचे संघटन मंत्री झाले तेव्हा देशात भाजपाची स्थिती बिकट होती. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपाला कोणीही चेहरा नव्हता आणि तेथील लोकांची मतेही पक्षासाठी अनुकूल नव्हती. देशात भाजापाचे केवळ दोन खासदार होते, तेव्हा मोदी हे भाजपाचे संघटन मंत्री झाले. 1987 पासून संघटनेच्या माध्यमातून लोकांमध्ये पक्षाची विश्वसनीयता कशी तयार करता येईल याचं उत्कृष्ट उदाहरण मोदींनी तयार केले.

मोदींचे संघटन मॉडेल

मोदी संघटन मंत्री झाल्यानंतर केवळ एकाच वर्षात अहमदाबाद महापालिका निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदाच एकहाती सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर भाजपाचा यशस्वी प३वास सुरू झाला. 1995 मध्ये भाजपाने गुजरातची सत्ता मिळवली, जी आजतागायत कायम आहे. कठोर परिश्रम, योग्य नियोजनाच्या जोरावर मोदींनी भाजपाचे कमळ गुजरातमध्ये खुलवले, असे अमित शहा यांनी सांगितले. त्यावेळी देशभरातील सर्वच पक्षांनी मोदींनी तयार केलेल्या गुजरातच्या संघटन मॉडेलचा अभ्यास करायला सुरुवात केली.

(हेही वाचाः खोटं बोलणा-यांना त्यावेळी बाळासाहेबांनी काढून टाकले! उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला)

जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांना वाचा फोडणं हे राजकीय पक्षांचे काम आहे. विरोधात असताना आंदोलनाच्या माध्यमातून तर सत्तेत असताना नीतीमूल्यांच्या आधारे जनतेचे प्रश्न सोडवले जातात, असेही शहांनी सांगितले.

गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी केला विकास 

गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींसमोर फार मोठे आव्हान होते. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना प्रशासनाचा कुठलाही अनुभव नव्हता. त्यांनी साधे सरपंचपद सुद्धा भूषवले नव्हते. पण तरीही मोदींनी त्यावेळी उत्तम काम केले. भूकंपामुळे भाजपाला काळा डाग लागेल असे समजले जात होते, तिथे भूजचा विकास मोदींनी करुन दाखवला. विकासाला सर्वसमावेशक करण्यासाठी मोदींनी अनेक योजना सुरू केल्या.

समस्या सोडवणा-या मोदींचा भर

आदिवासींसाठी त्यांनी योजना सुरू केली. आदिवासी समाजाचा गुजरातमध्ये काँग्रेसने केवळ मतांसाठी वापर केला पण त्यांचा विकास कधीच केला नाही. तेव्हा 2003च्या बजेटमध्ये पहिल्यांदा मोदींनी आदिवासींना त्यांच्या सांविधानिक अधिकारानुसार निधी दिला, असे देखील अमित शहा यावेळी म्हणाले. समस्या येतात, त्या भविष्यातही येतील. पण आज मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून, समस्येचे तात्काळ निराकरण केले जाते, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि संवेदनशीलतेने त्या सोडविल्या जातात, असेही अमित शहा म्हणाले.

(हेही वाचाः उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा मी सीनियर!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here