-
प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) शनिवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठीही थांबणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण रायगडच्या पालकमंत्रिपदाचा रखडलेला तिढा सुटणार का, याबाबत उत्सुकता आहे.
(हेही वाचा – Mumbai मध्ये पायाभूत सुविधा, परिवहन व्यवस्था, वीज, पाणी सर्वत्र वाढला ताण; जनहित याचिकेतून उपस्थित झाले सवाल)
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत बराच काळ वाद सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावाले आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात या पदावरून संघर्ष आहे. गोगावले यांनी पालकमंत्रिपदासाठी दावा केला असला, तरी तटकरे यांचा प्रभाव लक्षात घेता हा प्रश्न अनुत्तरित आहे. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती दिली होती. आता अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यामुळे या तिढ्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – Drugs च्या धंद्याला पोलिसांचा हातभार; लातूरमध्ये अमली पदार्थांचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त)
अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्याची तयारी जोरात सुरू आहे. ते सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार असल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. सूत्रांनुसार, अमित शाह (Amit Shah) हे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मध्यस्थी करू शकतात. या भेटीत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. गोगावाले यांचे स्वप्न पूर्ण होणार की तटकरे यांचाच दबदबा कायम राहणार, हे लवकरच स्पष्ट होईल. या दौऱ्याला राजकीय महत्त्व आहे, कारण महायुतीतील अंतर्गत मतभेद दूर करून आगामी निवडणुकांसाठी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. रायगडकरांचे लक्ष आता शनिवारच्या या दौऱ्याकडे लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community