केंद्रीय मंत्री Amit Shah महाकुंभमेळ्यात होणार सहभागी; संगमावर करणार स्नान

230

महाकुंभात (Mahakumbh 2025) सहभागी होण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून कोट्यवधी भाविक प्रयागराजला (Prayagraj) पोहोचले आहेत. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक असलेल्या महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी सोमवारी २७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील दाखल होणार आहेत. अमित शाह गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या ‘त्रिवेणी संगम’च्या (Triveni Sangam) पवित्र पाण्यात स्नान करणार आहेत.   (Amit Shah)

गृहमंत्री अमित शाह यांच्या जीवनातील हा 10वा कुंभ दौरा असेल, ज्यात महाकुंभ, कुंभ आणि अर्धकुंभ यांचा समावेश आहे. अमित शहा यांनी आतापर्यंत 9 कुंभ आणि अर्ध कुंभमध्ये भाग घेतला आहे. नुकतीच गुजरातमधील एका कार्यक्रमात खुद्द अमित शाह यांनी ही माहिती दिली होती.

(हेही वाचा – GBS चा पहिला बळी, धायरीतील तरुणाचा सोलापुरात मृत्यू)

गृहमंत्री अमित शाह सकाळी 11 वाजता प्रयागराज संगम महाकुंभात पोहोचतील आणि प्रथम संगम येथे स्नान करून पूजा करतील. संगमस्नानानंतर महाकुंभमेळा परिसरातील बडे हनुमान मंदिरात दर्शन व पूजन केले जाईल आणि त्यानंतर पवित्र अक्षयवटीचेही दर्शन होईल. या दौऱ्यात अमित शाह अनेक नामवंत शंकराचार्य आणि संतांना भेटणार आहेत.

अमित शहांसोबत मुख्यमंत्री योगीही उपस्थित राहणार 

अमित शाहांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) ही उपस्थित राहणार आहेत. ते गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संगम स्नान, बडे हनुमान जी मंदिर आणि अक्षयवटी येथे भेट देतील. सीएम योगी गृहमंत्र्यांसोबत जुना आखाड्यातही जाणार आहेत. यानंतर उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज (Tourism Minister Satpal Maharaj) मानव उत्थान सेवा समितीच्या शिबिराचे उद्घाटन करतील. गृहमंत्र्यांसोबत ते शृंगेरी, पुरी आणि द्वारका पीठाच्या शंकराचार्यांना शिष्टाचार भेट होईल.

(हेही वाचा – Tilak Verma : तिलक वर्माच्या नाबाद ३१४ धावा, टी-२० मध्ये नाबाद राहण्याचा विक्रम)

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हेही महाकुंभात स्नान करणार  

केंद्रीय गृहमंत्र्यांशिवाय केंद्रीय संसदीय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू (Minister Kiren Rijiju) हेही प्रयागराजला येणार आहेत. दुपारी २.४० वाजता ते प्रयागराज महाकुंभात स्नान करतील. यानंतर गंगापूजन करून दुपारी साडेचार वाजता ते सेक्टर-8 येथील बुद्ध संगम शिबिरात जातील आणि त्यानंतर ते विश्व हिंदू परिषदेच्या शिबिरात सहभागी होतील.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.