पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १८, १९ फेब्रुवारीला थेट मैदानात उतरणार अमित शाह?

158

नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. पाच पैकी एकाच मतदासंघात म्हणजे कोकण शिक्षण मतदारसंघात भाजप विजय प्राप्त करू शकला उर्वरित चार मतदारसंघात पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुळे येत्या कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयार केली आहे. गुरुवारी भाजपने तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पाठवली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह देखील पोटनिवडणुच्या प्रचारासाठी थेट मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. येत्या १८ आणि १९ फेब्रवारीला अमित शाह पुण्यात येणार आहेत. पण प्रचारसाठी की इतर कोणत्या कार्यक्रमासाठी? हे आता समोर आले आहे.

तीन महिन्यांपूर्वी अमित शाह पुण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीचे उद्घाटन आणि एका सहकार परिषदेसाठी येणार होते. मात्र तेव्हा व्यस्त वेळापत्रकामुळे अमित शाह येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते १८ आणि १९ फेब्रुवारीला पुण्यात येत आहेत. म्हणून याचा संबंध पोटनिवडणुकीसाठी जोडला जात आहे. पण भाजपकडून हा दौऱ्या पूर्वनियोजित होता, पोटनिवडणुकीसोबत या दौऱ्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीष बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रविंद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, संजय उर्फ बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा ४० जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

(हेही वाचा – अधिवेशनापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीतील १० ते १५ आमदार फुटतील; बच्चू कडूंचा दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.