अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांची तोफ धडाडणार

163
अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांची तोफ धडाडणार
अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांची तोफ धडाडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारला केंद्रात सत्तेवर येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाजपकडून ‘मोदी @9’ हे जनसंपर्क अभियान हाती घेतले आहे. या अभियानाद्वारे प्रत्येक लोकसभेपर्यंत पोहोचण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार नाही, त्या मतदारसंघावर भाजपने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच पार्श्वभूमीवरून केंद्रीय मंत्री अमित शहांची काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात येत्या १० जूनला तोफ धडाडणार आहे.

‘मोदी @9’ साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणजेच नांदेडमध्ये सभा होणार आहे. येत्या १० जूनला या सभेचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. मोदी सरकारची कामगिरी खुद्द अमित शहा नांदेडमधून जनतेसमोर मांडणार आहेत.

(हेही वाचा – Narayan Rane : राऊत वेडसर, किती दिवस सहन करणार? – नारायण राणे)

दरम्यान रविवारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून सांगितले की, ‘कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शहा यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार’

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.