नाशिकच्या सभेत केंद्रीय मंत्री Amit Shah यांचा कार्यकर्त्यांना सल्ला; म्हणाले, ‘लोकसभेचा काळा डाग पुसून टाका’  

192
नाशिकच्या सभेत केंद्रीय मंत्री Amit Shah यांचा कार्यकर्त्यांना सल्ला; म्हणाले, 'लोकसभेचा काळा डाग पुसून टाका'  
नाशिकच्या सभेत केंद्रीय मंत्री Amit Shah यांचा कार्यकर्त्यांना सल्ला; म्हणाले, 'लोकसभेचा काळा डाग पुसून टाका'  

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून प्रचार सभांची जोरदार तयारी सुरू आहे. तसेच विरोधक ही आपल्या प्रचार सभांचा भोंगा वाजवत आहेत. याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले असून पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेत आहेत. नाशिक (Amit Shah Nashik visits) येथे नुकतीच सभा पार पडली. यावेळी त्यांनी उबाठा गट, शरदचंद्र  पवार गट आणि काँग्रेस मतदारांना भाजपाशी जोडावेत अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Amit Shah)

अमित शाह काय म्हणाले? 

अमित शहा म्हणाले की, काहीजण केवळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवतात. परंतु, आम्ही देश घडवण्यासाती निवडणूक लढवतो, सध्या १६ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तुम्ही सगळे मिळून जेवढ्या जागा जिंकल्यात त्यापेक्षा जास्त जागा भाजपाने जिंकल्या आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे, पुढे बोलताना अमित शहा यांनी २०२४ ची विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची बहुमताने सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. (Amit Shah)

(हेही वाचा – Ashok Chaudhary यांच्या पोस्टमुळे नितीश कुमार अस्वस्थ; पक्षांतर्गत नाराजी उघड)

लोकसभेतील पराभवाचा डाग पुसून टाका

महाराष्ट्रातील २०२४ ची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. एक कार्यकर्ता म्हणून एक संकल्प घेऊन पक्षाचे काम करा. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याचा ठपका पुसून टाका. त्यांच्याकडून आपला आत्मविश्वास खचवला जात आहे. जोशात नाही तर धैर्याने निवडणुकीला सामोरे जा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. (Amit Shah)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.