केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाला रविवारी रात्री अपघात झाला. या अपघातात चार पोलिसांसह पाच जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर डुमराव उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री स्वत: सर्व जखमींना घेऊन रुग्णालयात पोहोचले आणि रात्री उशिरापर्यंत तिथेच थांबले.
दोघांना गंभीर दुखापत
बिहारमधील बक्सर शहराहून पाटण्याकडे परतत असताना मथिला-नारायणपूर मार्गावरील डुमराव जवळ कोरानसराई पोलिस ठाण्याचे वाहन शेतात उलटले. त्याच्या शेजारीच चालणाऱ्या इनोव्हा कारमध्ये केंद्रीय मंत्री बसले होते. जखमींपैकी दोघांना गंभीर दुखापत झालीये.
बक्सर से पटना जाने के क्रम में डुमराव के मठीला-नारायणपुर पथ के सड़की पुल के नहर में कारकेड में चल रही क़ोरानसराय थाने की गाड़ी दुर्घटनाग्रस्त हो गई है। प्रभु श्रीराम की कृपा से सभी कुशल हैं। घायल पुलिसकर्मियों एवं चालक को लेकर डुमराव सदर अस्पताल जा रहा हूं। pic.twitter.com/ybTVi6jn5v
— Ashwini Kr. Choubey (@AshwiniKChoubey) January 15, 2023
या घटनेची माहिती खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून दिली. त्यांनी अपघाताचा व्हिडिओ ट्विट करून सांगितले की, बक्सरहून पाटण्याला जात असताना डुमरावच्या मथिला-नारायणपूर रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. दोन पोलिसांसह जखमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण सर्व जखमींना डुमराव रुग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे चौबे यांनी नमूद केलेय.
देर रात घायल दो पुलिसकर्मियों
कनिष्का तिवारी व शुभम कुमार को पटना एम्स में भर्ती कराया। ईश्वर उन्हें शीघ्र स्वस्थ करें। pic.twitter.com/m0qZydCb6n— Ashwini Kr. Choubey (@AshwiniKChoubey) January 16, 2023
(हेही वाचा – गडचिरोलीतील अहेरीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; शस्त्रसाठा जप्त)
Join Our WhatsApp Community