राज ठाकरेंसाठी नारायण राणेंकडून ३ ट्विट

149

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंच्या सभेला मनसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी शिवतिर्थावरील केलेल्या भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे. त्यांना राज ठाकरेचे भाषण इतके आवडले की त्यांनी राज यांच्यासाठी सलग लागोपाठ ३ ट्विट केल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या आदेशानंतर मशिदीसमोर हनुमान चालिसा सुरू!)

भाजपकडून राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना राज यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. पवारांचे राजकारण जातीयवादी असल्याचा पुनरुच्चार करत शिवसेनेला पवारांबरोबर जाण्यासाठी लोकांनी मतदान केले नव्हते, असेही राज ठाकरे म्हणाले. यावेळी वाढती महागाई, इंधन दरवाढ, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, यावर एक शब्दही ते बोलले नाहीत. तसेच भाजपविरोधातही ते काही बोलले नाहीत. उलट भाजपच्या सूरात सूर मिळवणारे असे त्यांचे भाषण राहिल्याने  भाजप नेते राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक करत आहेत. यामध्ये नारायण राणेंच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.

ट्विटमध्ये नारायण राणेंनी  काय म्हटलंय?

“गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.” तर ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे.” आणि “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.”, असे तीन ट्वीटद्वारे नारायण राणेंनी राज ठाकरेंचे कौतुक केले.

नारायण राणेंनी केले हे तीन ट्वीट

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.