राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हे सरकार पाडण्याचे बऱ्याचदा प्रयत्न झाले. मात्र भाजपला यात यश आले नाही. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील अनेकदा हे सरकार पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. तरी देखील राज्यातले सरकार काही अस्थिर होताना दिसत नाही. मात्र आता पुन्हा एकदा नारायण राणे यांनी आपल्या मनातले बोलून दाखवले आहे. राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका, असा टोलाच नारायण राणे यांनी लगावला.
(हेही वाचाः याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचा पायगुण! राणेंची बोचरी टीका)
तुम्ही मदत मागायच्या आधीच मोदींनी पाठवली आहे. बाकीची मदत आम्ही मिळवून देऊ, कोणी मागायची गरज नाही. केंद्र कोणतीही मदत बाकी ठेवत नाही. केंद्र सर्व मदत देते. आणि केंद्र सरकारकडे सारखीच मदत मागायची असेल, तर राज्य सरकार कशाला आहे? देऊन टाका राज्य केंद्राला चालवायला. इथे आम्ही वेटिंगवर बसलोय, असे देवेंद्र फडणवीसांकडे पाहून, मिश्किल हसत राणे म्हणाले.
(हेही वाचाः मुख्यमंत्री आले अन् आश्वासन देऊन गेले!)
राज्यात मुख्यमंत्री नाही
पाठांतर करुन यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही अशी भयावह परिस्थिती आहे. लोक चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते, काही कल्पना दिली नाही. लोकांना असलेला धोका लक्षात घेऊन स्थलांतरित करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. पण हे झालं नाही याला जबाबदार हे प्रशासन आहे, असा निशाणाही त्यांनी साधला.
(हेही वाचाः तळीये दुर्घटनाग्रस्तांना पक्की घरे बांधून देणार! नारायण राणेंची मोठी घोषणा)
इतके दिवस हेलिकॉप्टर मिळालं नाही का?
येथील प्रशासन बेजबाबदार आहे, त्यांना प्रोटोकॉल सुद्धा माहीत नाही. बेजबाबदारांवर कारवाई होणार, बेजबाबदर अधिकारी आमच्या चिपळूणमध्ये नको. आमच्या दौऱ्याच्या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला, अशी खोचक टीकाही राणे यांनी केली. आज दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना इतके दिवस हेलिकॉप्टर मिळालं नाही का? आज जे राज्यावर संकट आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे असावं, अशी टीकाही राणे यांनी केली.
Join Our WhatsApp Community