आधी स्वतःचं मन शुद्ध करा… राणेंचे शिवसेनेला चोख उत्तर

अनेक स्मारकं मी पाहिली, पण इथे काय आहे. साहेबांचा फोटोही सरळ दिसत नाही.

138

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर, काही शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. मात्र, आता यावरुन राणेंनी शिवसेनेवर आपल्या स्टाईलने हल्ला चढवला आहे. स्मृतीस्थळ दलदलीत आहे, आधी ते पहा, मग शुद्धीकरण करा. गोमूत्र शिंपडून स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतःच्या मनाचे शुद्धीकरण करा, असा हल्ला नारायण राणे यांनी शिवसेनेवर चढवला. शुक्रवारी राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस असून, त्यांनी सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांचा आक्रमक पवित्रा पहायला मिळाला.

(हेही वाचाः बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण)

काय दुषीत झालं, ते त्यांना विचारा

मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे, मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा, अशी अपेक्षा असते. देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी मला पत्रकार केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयावर प्रश्न विचारत आहेत. आम्ही त्यासाठी आलो आहोत का? मला कोणासमोर नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे, गोमूत्र का शिंपडलं?, काय दुषीत झालं होतं? हे त्यांना विचारा. ते स्मारक ज्या स्थितीत आहे, तिथे जाऊ शकत नाही. मी पँट वर करुन त्या दलदलीतून आतमध्ये गेलो. अनेक स्मारकं मी पाहिली, पण इथे काय आहे. साहेबांचा फोटोही सरळ दिसत नाही. बाळासाहेबांचं स्मारक हे जागतिक किर्तीचं व्हावं हे माझं उत्तर आहे, असे नारायण राणे म्हणाले.

(हेही वाचाः राणे आले, पण बाळासाहेबांना चाफ्याची फुले आणायला विसरले!)

दोनशे रुपये देऊन शुद्धीकरणाला पाठवलं

राणेंना येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो, तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे, पाच सहा जणांना दोनशे रुपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता. शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे, आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही राणेंनी लगावला.

(हेही वाचाः राणेंची जन आर्शीवाद यात्रा अन् सेनेला ‘असा’ बसला दणका!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.