‘मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका लागत नाहीत’,राणेंचा ठाकरेंवर घणाघात

148

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे भाकीत उद्धव ठाकरे यांनी वर्तवले होते. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप होत असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर जोरदाच घणाघात केला आहे. मुख्यमंत्रीपद गेल्याच्या नैराश्येतून उद्धव ठाकरे अशी विधाने करत असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी म्हटले आहे.

मला त्यांच्या विधानावर उत्तर द्यायचे नाही

उद्धव ठाकरे हे काय भविष्यवाणी सांगत आहेत का?, मुख्यमंत्री असताना ते कधीही मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. त्या काळात त्यांनी राज्याला विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे नेले. राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असं होत नाही. त्यामुळे त्यांच्या घरात बसून बोलण्याला मला उत्तर द्यायचे नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या आमदारांसह गुवाहटीला जाणार! काय आहे कारण)

गुजरात विधानसभा निवडणुकांचीही जबाबदारी 

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी देखील भाजपने आपल्यावर जबाबदारी टाकली असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले आहे. मला दोन-चार मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येईल, त्याबाबत लवकरच माहिती देईन,असेही नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.