योद्धा पुन्हा मैदानात…..!

सिंधुदुर्ग, कणकवली शहरात नारायण राणेंचे जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसली आहे.

107

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला शुक्रवार, २७ ऑगस्टपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा २ दिवस स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला आले आहेत. त्यांच्या या यात्रेचा शेवटचा टप्पा आहे. आज ते रत्नागिरीत यात्रा काढणार आहेत, त्यानंतर संध्याकाळी ते त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहेत. तिथे २ दिवस शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

बालेकिल्ल्यात जंगी स्वागत!

मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंना अपशब्द वापरला आणि त्यानंतर झालेला राडा सगळ्या देशाने पाहिला. आता हे सगळे पाठीमागे सोडून राणे पुन्हा एकदा जनआशीर्वाद घ्यायला निघाले आहेत. त्यासाठी रत्नागिरीत त्यांचे जंगी आले. तसेच सिंधुदुर्ग, कणकवली शहरातही राणेंचे जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसली आहे. ‘योद्धा पुन्हा मैदानात’, अशा आशायचे बॅनर्स शहरभर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणेंचा फोटो आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक फ्लेक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये राणेंच्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राणे आज रत्नागिरी जिल्ह्यात असतील तर पुढचे दोन दिवस सिंधुदुर्गात असतील. नितेश राणेंनी शेअर केलेल्या फ्ले्सवर देखील योद्धा पुन्हा मैदानात, असे लिहिले आहे. यात्रेसाठी भाजप नेते आशिष शेलार, विनोद तावडे सहभागी असणार आहेत, मात्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा दौरा अचानक रद्द झालेला आहे. आजचा होणारा दौरा रद्द झाल्याचे प्रशासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. यामागील ठोस कारण आणखी समजू शकले नाही.

(हेही वाचा : हिंदुत्वासंबंधी भाजपासोबतचे नाते कायम राहणार! संजय राऊतांची भूमिका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.