चिंचवडमधील एका प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर एक बोचरी टीका केली होती. ज्यामुळे आता पवार आणि राणेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका बाईनं निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी नारायण राणेंवर केली होती. याच पार्श्वभूमीवरून नारायण राणे यांनी अजित पवारांना चांगलाच दम देऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे काय म्हणाले?
प्रसार माध्यमासोबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, ‘अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं हे मला माहित नाही. खरंतर मला त्यांच्याबद्दल बोलायची इच्छा नाही. अजित पवार ज्या प्रकारचे राजकारणी आहेत, त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्याचं बारसं करायला जाऊ पण नये, नाव ठेवायचं. त्यामुळे माझ्या फंद्यात पडून नका, नाहीतर मी पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन.’
पुढे राणे म्हणाले की, ‘माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबई आहे. पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवलं. तिकडून सलग सहावेळा निवडणूक आलो, एक नाही तर सहा वेळेला. त्यानंतर काँग्रेसच्या सोनिया गांधींनी सांगितलं, तुम्ही वांद्र्यातून उभे राहा. त्यांच्या म्हणण्यानुसार उभा राहिलो, माझ्या मतदारसंघात उभा नाही राहिलो. आणि महिला किंवा पुरुषांनं पाडणं असो उमेदवार हा उमेदवार असतो. तर महिला आणि पुरुषांमध्ये काय फरक करता. आता ती महिला आहे का त्यांच्याकडे, आता कोणाकडे आहे?’
(हेही वाचा – उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांच्या भेटीवर नितेश राणेंची टीका; म्हणाले, आता खलिस्तानवाद्यांचे समर्थन)
नारायण राणेंना कोणी पाडलं होत?
२०१५ मधील वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंना हरवलं होतं. यावेळेस नारायण राणे काँग्रेसकडून रिंगणात उतरले होते. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. तृप्ती सावंत यांनी तब्बल २० हजारांच्या फरकानं नारायण राणेंचा पराभव केला होता. पण २०२१ साली तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Join Our WhatsApp Community