केंद्रीय मंत्री झालेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला येत्या 19 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. राणे जन आशीर्वाद काढणार म्हणजे त्याची चर्चा तर होणारच. शिवसेनेवर आपल्या राणे स्टाईलने प्रहार करणाऱ्या राणेंचा जन आशीर्वाद दौरा देखील तितकाच चर्चेचा ठरतोय.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे घेणार दर्शन
या चर्चेमागचे कारण म्हणजे नारायण राणे हे शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. राणे पहिल्यांदाच स्मृती स्थळावर येणार असल्याने आता शिवसैनिकांच्या पोटात देखील चांगलाच गोळा आला आहे. दरम्यान पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंची ही खेळी असल्याची जोरदार चर्चा आहे.
(हेही वाचाः नारायण राणेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट! कोकणासाठी ‘या’ केल्या मागण्या! )
राणेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन
राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून 19 आणि 20 तारखेला मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्यात येत असून, राणेंचे मुंबईतील कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत. 19 ते 26 ऑगस्टपर्यंत राणेंची ही यात्रा सुरू राहणार असून, त्या माध्यमातून ते शक्ती प्रदर्शनही करणार आहेत. 21 तारखेला वसई-विरार आणि 23 ते 26 ऑगस्ट कोकणात जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. 170 हून अधिक भागांना राणे भेट देणार आहेत. मुंबई व कोकण भागात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत.
Join Our WhatsApp Community