गडकरींना पुन्हा एकदा कोरोनाची लागण! म्हणाले…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या देशात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असताना, राजकीय नेते या कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर आता नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

गडकरी यांचं ट्विट

सौम्य लक्षणे जाणवत असल्याने, कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनमध्येच उपचार घेणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. मी कोरोना संबंधिची सगळी काळजी घेतो आहे. सध्या मी घरात राहूनच उपचार घेतोय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

( हेही वाचा: ”महाराष्ट्रात धक्कादायक परिस्थिती, सरकारचा सीबीआयवर विश्वास नाही!” )

पुन्हा एकदा लागण 

त्यांनी केलेल्या ट्विटनंतर देशातील अनेक नेत्यांनी ट्विट करत, लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली होती. आता लसीकरणाचे दोन्ही डोस त्यांनी घेतले होते. मात्र, पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here