नागपुरातील रस्ते अपघातासंबंधी केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले…

200
नागपुरातील रस्ते अपघातासंबंधी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले...
नागपुरातील रस्ते अपघातासंबंधी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले...

देशासह राज्यभरात रस्ते अपघाताच्या (Nagpur road accident) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत नागपूर येथील रवी भवन सभागृहात झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट रिव्ह्यू (Zero Fatality District Review) आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक (District Road Safety Committee Meeting) आयोजित करण्यात आली होती. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी (२८ जुलै) दिले. (Nitin Gadkari)

(हेही पाहा – Maratha Reservation वरील विरोधकांच्या खोट्या नेरेटिव्हचा सोमवारी पर्दाफाश करणार; Pravin Darekar यांचा इशारा)

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ॲम्बुलन्सच्या आतच अपघातग्रस्त वाहनातून वाहनाचे भाग कापून जखमींना बाहेर काढण्याची सोय असावी. तसेच त्वरित वैद्यकीय मदत घटनास्थळीच मिळण्यासाठीचा एक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देता यावा. यादृष्टीने वैद्यकीय विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वय साधून यंत्रणा तयार करावी. जेणेकरून अपघातानंतरच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांचा जीव वाचेल, अशी सूचनाही गडकरी यांनी केली. बैठकीच्या वेळी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल (Police Commissioner IPS Dr. Ravindra Singal), महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. हर्ष पोद्दार उपस्थित होते. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नादात व्हॉटस्अपच्या ग्रुपमध्ये अॅड केले अन् ३४.६२ लाख रुपयांना फसवले )

२०२३ या वर्षी शहरात ३०८ तर ग्रामीणमध्ये ४४० जणांचा रस्ते अपघातात नागरिकांचा मृत्यू

रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘सेव लाईफ’ (Save Life Organization) या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रविण तिवारी यांनी नागपूर ग्रामीण आणि शहरात घडलेल्या रस्ते अपघातांची तसेच त्यावर संबंधित यंत्रणेला सुचवलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागपूर ग्रामीणमध्ये गेल्या वर्षी ४४० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यावर्षी अपघाताच्या संख्येत ४ टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्यावर्षी नागपूर शहरात ३०८ मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. (Nitin Gadkari)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.