राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजप खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत कोरोना काळात संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. भारती पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह त्यांनी मुंबईतही बैठका घेतल्या. या बैठकीनंतर आज गुरूवारी भारती पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा- मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?)
Union MoS for Health and Family Welfare, Dr Bharati Pravin Pawar tested positive for Covid-19 pic.twitter.com/uGPEDFnytL
— ANI (@ANI) January 6, 2022
भारती पवार यांनी १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ केला होता. यावेळी भारती पवार अनेकांच्या संपर्कात आल्या होत्या. भारती पवार यांनी त्रास होत असल्यामुळे कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती भारती पवार यांनी ट्विट करून दिली असून या ट्विटमध्ये भारती पवार यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करुन स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, बुधावारी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत बैठकांना उपस्थित राहिले होते. मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यातही हेमंत गोडसे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत होते. कार्यक्रम आणि दौऱ्यानंतर गोडसेंचा कोरोना अहवाल पहिला पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर आज डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Communityआज कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सतर्क रहावे. व लक्षणे आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करुन घ्यावी,ही
नम्र विनंती 🙏
लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईल.सर्वांनी काळजी घ्या, शासनाच्या नियमांचे पालन करा !— Hemant Tukaram Godse (@mphemantgodse) January 5, 2022