वंदना बर्वे
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर बिहारमध्ये राजकीय वाद तीव्र झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडखोरी हे विरोधकांच्या एकजुटीच्या पाटणा बैठकीचे फलित असल्याचे सुशील कुमार मोदी यांचे म्हणणे आहे. लवकरच जनता दल युनायटेडमध्येही फूट पडणार आहे. लोजपा (रामविलास) सुप्रीमो चिराग पासवान यांनी तर अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी मोठा दावा करत एक-दोन दिवसांत बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल, महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल, असे सांगितले.
(हेही वाचा – अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत)
सुशील मोदींनी राजकीय उलथापालथीच्या दाव्यामागे तर्कही दिला आहे. ते म्हणाले की, बिहारमध्येही बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे, कारण नितीश कुमार यांनी गेल्या १७ वर्षांत कधीही आमदार आणि खासदारांना भेटण्यासाठी वेळ दिला नाही. लोकांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली. आता ते प्रत्येक आमदार आणि खासदाराला ३० मिनिटे देत आहेत. नितीश कुमार यांनी पुढच्या लढाईसाठी राहुल गांधींना नेता म्हणून स्वीकारले आणि तेजस्वी यादव यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नाव दिल्यापासून जनता दल युनायटेडमध्ये बंडखोरीची परिस्थिती झाली आहे. येथे जेडीयू सोडून आपला नवा पक्ष स्थापन केलेल्या उपेंद्र कुशवाह यांनीही जेडीयूमध्ये मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community