उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांचेही वाईट दिवस सुरू झाले आहेत. शरद पवारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी युती केली असती, तर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळू शकले असते किंवा ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवारही होऊ शकले असते, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवे होते. मी दोन्ही पक्षांना (भाजप आणि शिवसेना) हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला होता, पण तसे झाले नाही. होय, पण अमित शाह यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला नव्हता. भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला’दिल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठा दावा केला आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबतीतही तेच होणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीची ताकद अजित पवार यांच्यामुळेच होती, आता ते भाजपासोबत आल्याने राष्ट्रवादीची अवस्था गंभीर झाली आहे, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community