Shrikant Shinde यांच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री शेखावत यांचे उत्तर; म्हणाले, शिवरायांची स्मृतिस्थळे… 

87

महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी स्मृतिस्थळांचा विकास करत ती एकमेकांना जोडत ‘Tourist Circuit’ बनवण्याचा केंद्र सरकार विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Union Tourism Minister Gajendra Singh Shekhawat) यांनी सोमावारी दिली. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) संबंधित सर्व पैलू एकत्रितपणे प्रदर्शित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. (Shrikant Shinde)

(हेही वाचा – MahaKumbh 2025 : प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी अभूतपूर्व गर्दी)

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पर्यटन सर्किट बनवण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर पर्यटन मंत्र्यांनी सांगितले की, पुण्यातील शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क (Shivshristi Historical Theme Park, Pune) विकसित करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित सर्व पैलू प्रदर्शित करण्यासाठी राज्य सरकारने अलीकडेच एक सविस्तर योजना सादर केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी त्यासाठी ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. यामध्ये केंद्र सरकारने ७६ कोटी रुपयांची मदतही दिली. याअंतर्गत लोहगड किल्ल्याचे (Lohgad Fort) नूतनीकरण करण्याची योजना आखण्यात आली. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. या योजनेवर काम केले जात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील (Sindhudurg forts) संग्रहालयासाठी ४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नौदलाच्या ध्वजाला छत्रपती शिवाजी महाराज ध्वज असेही नाव दिले असल्याचे ते म्हणाले.

(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी; आमदार Sangram Jagtap यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी)

केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकारने महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील किल्ल्यांची एकत्रित यादी जागतिक वारसा समितीला सादर केली आहे. भविष्यात यामुळे देशातील पर्यटनाला आणखी चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच या संदर्भात राज्य सरकारकडून जे काही प्रस्ताव येतील, त्यांचा विचार केला जाईल. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.