यासाठीच ‘मी सर्व मंत्र्यांचे लाल दिवे काढून घेतले!’ गडकरींनी सांगितले कारण

त्यामुळे माझ्यावर बरेच जण नाराज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

79

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या मिश्कील भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणात ते अनेकदा काही गंमतीदार किस्से, काही विनोदी वाक्यांनी श्रोत्यांची मनं जिंकतात. रविवारी नाशिक येथील थीम पार्कच्या उद्घाटनासाठी गडकरी आले असतेना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण देत अनेक मुद्दे मांडले.

ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या सगळ्यांनाच नेहमी त्रास होतो. त्यामुळे कुठल्याही कामात आपण एकाग्र होऊ शकत नाही. गाड्यांच्या कर्कश आवाजांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या एका युक्तीबद्दल त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

(हेही वाचाः गडकरी म्हणाले, आम्हाला विदर्भाची लाज वाटते!)

काही जण माझ्यावर नाराज

गाड्यांच्या हॉर्नमुळे होणारे ध्वनी प्रदूषण हे माझ्यामुळे आहे, असे माझ्या लक्षात आले. कारण मी केंद्रीय वाहतूक मंत्री आहे आणि मोटार व्हेइकल अॅक्ट माझ्या अखत्यारित आहे. त्यामुळे त्याचा वापर करत मी सगळ्या मंत्र्यांचे लाल दिवे आणि सायरन काढून घेतले, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे माझ्यावर बरेच जण नाराज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः तर तुला सोडणार नाही… गडकरी कंत्राटदाराला काय म्हणाले होते? वाचा किस्सा)

लाल दिव्याच्या गाडीत बसलेल्याला मोठी मजा वाटते की आपल्यासाठी रस्ता बंद आहे, पोलिस बंदोबस्त आहे. पण त्यांच्यामुळे बाहेर ज्यांना ताटकळावं लागतं त्यांना केव्ही ही बियाद जाते, असं वाटत असतं. त्यामुळे मी याबाबतीत पंतप्रधानांना सांगून लाल दिवे काढून टाकले, असे म्हणत गडकरींनी चांगलाच हशा पिकवला.

या गाड्यांवर लागणार आकाशवाणीची ट्यून

तसेच अॅम्ब्युलन्स आणि काही पोलिस गाड्यांसाठी सायरन हे आवश्यक आहेत. त्यासाठी पर्यावरण कायद्यात लवकरच सुधारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आकाशवाणीवर जी ट्यून वाजते ती ट्यून या गाड्यांना बसवण्याचा विचार असल्याचे सांगत याबाबत लवकरच कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

(हेही वाचाः कोविड काळात गडकरी असे कमावतात दरमहा चार लाख)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.