कालपर्यंत संयुक्त राष्ट्र संघात भारताचा सहभाग म्हणजे एक सोपस्कार होता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचे युएनच्या वार्षिक बैठकांमध्ये पडसाद उमटत असतात, त्यात भारत कायम याचकाच्या भूमिकेत असायचा. पाकिस्तानकडून दिला जाणारा त्रास आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडत राहणे, याव्यतिरिक्त भारताकडून काही घडले नाही. मात्र 2014 पासून यात अमुलाग्र बदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाला भारताकडील वैचारिक समृद्धता, अध्यात्मिक बळ, हिंदू संस्कृती, मानवतावादी विचार, वसुधैव कुटुंबकम अशी भारताची ओळख करून दिली आणि अवघ्या जगाला भारताने संयुक्त राष्ट्र संघात असणे किती महत्वाचे आहे, हे पटू लागले. 30 ऑक्टोबर 1945 रोजी भारताला संयुक्त राष्ट्र संघात प्रथम सदस्यत्व देण्यात आले होते. त्यानंतर ७ दशकाने भारत विश्वगुरू ठरत आहे.
2014 ते 2021 दरम्यान भारताची संयुक्त राष्ट्र संघात कामगिरी
- शांतता राखणे, मानवतावादी दृष्टीकोन ठेवणे आणि लैंगिक शोषण दूर करण्यासाठी वचनबद्धता राखणे यासाठी युएन महासचिव आणि भारत सरकार यांच्यात नोव्हेंबर 2017 मध्ये एक करार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतला.
- सप्टेंबर 2018 मध्ये युएनईपीने पंतप्रधान मोदींना आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा प्रसारासाठी “पॉलिसी लीडर” म्हणून मान्यता दिली. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवले जाते. इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA) ची संयुक्त राष्ट्रात करारावर आधारित म्हणून नोंदणी करण्यात आली.
- 9 फेब्रुवारी 2018 पासून आंतरराष्ट्रीय सोलार करार करण्यात आला.
- आॅगस्ट २०१७ मध्ये भारताने प्रदूषण नियंत्रणासंबंधी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली.
- डिसेंबर 2014 मध्ये ठराव संमत केला. त्यात दिवाळी, बुद्ध पौर्णिमा आणि गुरुपूरब या भारतीय सणांना युएनने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये युएनच्या मुख्यालयात प्रथमच दिवाळी साजरी करण्यात आली.
(हेही वाचा कर्नाटकात २०० उर्दू शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरु)
- सप्टेंबर 2018 मध्ये योगदिन म्हणून घोषित करण्यात आला, UNGA मध्ये हा ठराव करण्यात आला.
- भारताने 13 जुलै 2020 रोजी NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी युएनमध्ये भारताचा अहवाल सादर केला.सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्यात प्रतिबिंबित झालेल्या राष्ट्रीय विकास अजेंडा ठळक करण्यात आला.
- नोव्हेंबर 2018 मध्ये भारताने लेबनॉनच्या मदतीसाठी 120 सैन्यांची तुकडी युएनच्या पथकासोबत कझाकस्तानमधून पाठवली होती.
- UN कर समितीच्या स्वयंसेवी विश्वस्त निधीमध्ये भारताचे योगदान (संयुक्त राष्ट्रसंघाच्या करविषयक समितीच्या कामात विकसनशील देशांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी, जे शाश्वत विकासासाठी संसाधने एकत्रित करू शकतील अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवतात) UNGA च्या सप्टेंबर 2017 च्या ठरावात मान्यता देण्यात आली.
- 52 वर्षांच्या अंतरानंतर 24 ऑक्टोबर 2018 रोजी यूएन डे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला. त्याची शांतता आणि अहिंसा अशी संकल्पना ठेवण्यात आली होती.
- 24 सप्टेंबर 2019 रोजी भारताने UN मध्ये उच्चस्तरीय कार्यक्रम आयोजित करून महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे स्मरण केले. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यात UNSG अँटोनियो गुटेरेस, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिका आर्डेन आणि जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होलनेस संयुक्त राष्ट्र पोस्टल प्रशासन (UNPA) मिशनच्या सहकार्याने खालील तीन पोस्टल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली.
- एमएस सुब्बुलक्ष्मी यांच्या युएनमधील कामगिरीच्या निमित्ताने त्यांच्या 50व्या जन्मशताब्दी निमित्त पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करण्यात आले.
- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करण्यात आले.
- दिवाळीच्या निमित्ताने विशेष पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करण्यात आले.
- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष स्मरणार्थ तिकिट प्रसिद्ध करण्यात आले.
(हेही वाचा श्रीक्षेत्र जांबमधून देवतांच्या मूर्ती चोरणारे आरोपी निघाले धर्मांध मुस्लिम )
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जुलै 2020 रोजी आभासी माध्यमाच्या सहाय्याने भाषण केले. या भाषणाची संकल्पना ‘कोविड 19’ होती. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोविड-19 चा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परामर्श केला.
- जागतिकीकरण UN च्या स्थापनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी 21 सप्टेंबर 2020 रोजी UN मध्ये त्यांचे आभासी भाषण केले. 26 सप्टेंबर 2020 रोजी UNGA च्या 75 व्या सर्वसाधारण चर्चेत त्यांनी भारताची भूमिका मांडली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 डिसेंबर 2020 रोजी शिखर परिषदेत भाषण केले. तेव्हा त्यांनी वचन दिले की, 2047 पर्यंत भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगाच्या अपेक्षांपेक्षा जास्त
प्रयत्न असेल.
काय आहे संयुक्त राष्ट्र संघ?
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यांकरिता 24 ऑक्टोबर 1945 रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे असून तिच्या सदस्यांची संख्या 192 (2007) होती. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच राष्ट्रसंघ ही संघटना अनेक कारणांनी निष्प्रभ ठरली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीस (1939) इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांतील नेत्यांनी युद्धोत्तर काळातील समस्यांच्या सोडवणुकीचा विचार सुरू केला होता. रशिया व फ्रान्स या राष्ट्रांचे नेतेही या प्रक्रियेत सहभागी झाले. ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट यांची अटलांटिक महासागरातील एका युद्धनौकेवर 14 ऑगस्ट 1941 रोजी भेट झाली. तीत त्यांनी युद्धाची उद्दिष्टे जाहीर केली. ती ‘अटलांटिक सनद’ या नावाने प्रसिद्ध आहे. याच बैठकीत युद्धोत्तर कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा मनोदय या नेत्यांनी व्यक्त केला. फ्रँक्लिन रूझवेल्ट यांनी या भावी संघटनेस ‘संयुक्त राष्ट्र’ ही संज्ञा सुचविली. पुढे शत्रू-राष्ट्रांविरूद्ध एकत्रित आलेल्या सव्वीस मित्र-राष्ट्रांनी अटलांटिक सनदेला पाठिंबा दर्शविला आणि 1 जानेवारी 1942 रोजी प्रथमच ‘संयुक्त राष्ट्रे’ या संस्थेच्या अधिकृत स्थापनेस सहमती दर्शविली. जर्मनी-जपान-इटली या शत्रू-राष्ट्रांविरूद्धच्या दुसऱ्या महायुद्धातील सामूहिक कारवाईचा उल्लेख मित्र-राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रे असा केला होता. मॉस्को येथील 30 ऑक्टोबर 1943 च्या परिषदेच्या जाहीरनाम्यात चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोव्हिएट रशिया आणि ग्रेट ब्रिटन यांनी राष्ट्रसंघाच्या जागी आंतरराष्ट्रीय संघटनेची निकड प्रतिपादिली.
(हेही वाचा नुसता जंगली नव्हे, तर शहरी नक्षलवादाचाही बिमोड करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन)
Join Our WhatsApp Community