अमेरिकेचे काबूलमधून कमबॅक! आता पुढे काय? 

अमेरिकेतील सिनेट सदस्यांनी अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्याला मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे गांभीर्याने विचार करत आहेत.

89

अमेरिकेने ठरवल्याप्रमाणे ३१ ऑगस्टपासून संपूर्ण सैन्य माघार घेणार आहे. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यावर अफगाणिस्तानचे भविष्य काय असणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. तज्ज्ञांच्या मते अफगाणिस्तानवर तात्काळ चीन नियंत्रण मिळवू शकते, तसेच रशियादेखील याला पाठिंबा देऊ शकते, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडताना तालिबान्यांसाठी ‘मास्टर स्ट्रोक’ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंजशीरला अमेरिका देईल मान्यता!

अमेरिकेतील सिनेट सदस्यांनी अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्याला मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामुळे अमेरिकेला आशियायी खंडात स्वतःचे तळ निर्माण करणे शक्य होणार आहे, यासाठी अमेरिका पंजशीर येथे लष्करी तळ निर्माण करणार असेल तर मात्र तालिबान्यांसाठी पंजशीर हे कायमचे आव्हान निर्माण होणार आहे. त्यासाठी अमेरिकेला अनुकूल परिस्थिती पंजशीर येथे आहे. या ठिकाणी तरुणांनी हाती शस्त्रे घेऊन तालिबान्यांना रोखले आहे. त्यामुळे अफगाणिस्तान ताब्यात येऊनही तालिबान्यांना पंजशीर खोरे ताब्यात घेण्यात अपयश आले आहे. तसा प्रयत्न तालिबान्यांनी केला होता, मात्र पंजशीर येथील तरुणांनी तो हाणून पाडला. त्यावेळी या तरुणांकडे अमेरिकेची शस्त्रास्त्रे आढळून आली आहेत. त्यामुळे अमेरिका पंजशीरला मान्यता देऊन अफगाणिस्तानमध्ये फूट पडू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण जर तसे घडले नाही तर मात्र सध्या पंजशीर तरुणांकडे दारुगोळा संपल्यावर त्यांना तालिबान्यांना शरण जावे लागणार आहे.

(हेही वाचा : २१व्या शतकातील खिलाफत चळवळ आणि ‘खलिफा’!)

भारताला धोक्याची घंटा! 

दरम्यान अमेरिकेने सी-१७ या विमानातून अमेरिकन सैन्यांची शेवटची तुकडी घेऊन मायदेशी परतले, त्यानंतर लागलीच तालिबान्यांनी काबूल विमानतळाचा ताबा घेतला आणि अक्षरशः हवेत अंदाधुंद गोळीबार करत आनंद साजरा केला. जरी तालिबान्यांनी अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही देशाच्या विरोधात वापरू देणार नाही. आम्हाला सर्व देशांशी चांगले संबंध हवे आहेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यात भारताचाही उल्लेख केला आहे. मात्र दुसरीकडे पाकिस्तानने तालिबान्यांवर चीनच्या साहाय्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आधीपासूनच पाकिस्तानी सैन्याने तालिबान्यांनी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याने पाकिस्तान आणि तालिबानने संबंध सुधारले आहेत. आता पाकिस्तान तालिबान्यांना काश्मीरकडे मोर्चा वळवण्याची गळ घालू शकते, अशी शक्यता आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.