University Guidelines : समूह विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी

 राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

144
University Guidelines : समूह विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी
University Guidelines : समूह विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी

राज्यातील शिक्षण संस्थांच्या समूह विद्यापीठासाठी (University Guidelines) मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली असून शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या मार्गदर्शक तत्वांना मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे विद्यापीठांवरील भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील, असा विश्वास सरकारला वाटतो. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील.

ही विद्यापीठे सार्वजनिक विद्यापीठे राहणार आहेत. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात अशा प्रकारे चांगल्या शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात डॉ.होमीभाभा राज्य विद्यापीठ मुंबई, हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलिजिएट विद्यापीठ मुंबई, कर्मवीर भाऊराव पाटील, सातारा अशी तीन  समूह विद्यापीठे आहेत.

समूह विद्यापीठासाठी इच्छुक असणारे प्रमुख महाविद्यालय शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारे, आवश्यक ती पायाभूत सुविधा, प्रशिक्षित आध्यापक तसेच समूह  विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय किंवा संस्था असावी. समूह  विद्यापीठ तयार करण्यासाठी एकाच व्यवस्थापन किंवा शैक्षणिक संस्थेच्या किमान दोन आणि  कमाल पाच अनुदानित किंवा विना अनुदानित महाविद्यालयाचे एकत्रिकरण करणे आवश्यक राहील. कृषी आणि आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व पारंपरिक तसेच  व्यवसायीक महाविद्यालये समूह विद्यापीठात समाविष्ट होऊ शकतील. पाचपेक्षा जास्त महाविद्यालये किंवा संस्था समूह विद्यापीठात समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकार मूल्यांकन  करेल.

(हेही वाचा-BMC : ‘स.का.पाटील’ उद्यानासह ‘बाबुला टँक मैदान’ आणि ‘वाल्टर डिसुझा’ उद्यानाचेही नुतनीकरण)

समूह विद्यापीठातील प्रमुख महाविद्यालय मागील २० वर्षांपासून कार्यरत असावे. तसेच या महाविद्यालयात किमान दोन हजार विद्यार्थी असावेत तसेच ही संख्या मिळून सहभागी महाविद्यालयांमध्ये किमान चार हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक आहे. या महाविद्यालयांकडे एकत्रितपणे १५ हजार चौ.मी. इतके एकत्रित बांधकाम आवश्यक असून विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी चार  हेक्टर जागा आणि राज्यातील उर्वरित भागासाठी सहा  हेक्टर जागा असावी.

प्रमुख महाविद्यालय हे किमान पाच  वर्षांपासून स्वायत्त दर्जा प्राप्त असलेले असावे किंवा या महाविद्यालयास नॅकचे किमान ३.२५ सीजीपीए मानांकन किंवा समतुल्य एनबीए गुण असणे आवश्यक आहे. किंवा एकूण अभ्यासक्रमांपैकी ५० टक्के अभ्यासक्रम एनबीए द्धारा मान्यताप्राप्त असावे. याशिवाय इतरही काही आवश्यक बाबी या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाचे (University Guidelines) कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासह सात  पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी राज्य सरकारकडून  एक  कोटी रुपये अशी रक्कम पहिल्या पाच वर्षांसाठी  विद्यापीठाला देण्यात येईल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.