आता पुन्हा त्या फोटोची चर्चा, गुगलवर सेना भवन टाकल्यास मिळतो सोनिया गांधींचा फोटो

सेना भवन…शिवसैनिकांचे श्रद्धास्थान…याच सेना भवनभवन कुणी वाकड्या नजरेने पाहिले तरी शिवसैनिकांची तळपायाची आग मस्तकात जाते. मात्र आता गुगलवर जर सेना भवन सर्च केले तर चक्क सोनिया गांधी यांची फोटो असलेला सेना भवनचा फोटो मिळतो. राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू असताना गुगलमध्ये मात्र या येणाऱ्या फोटोमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजेकाँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने सोनिया गांधी यांचे पोस्टर लावल्याचा दावा यात करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या जागी सोनिया गांधी यांचा फोटो लावल्याचे यात दिसत असून शेअर करताना हा दावा करण्यात आला होता. मात्र त्यात कुणीतरी खोडसाळ पणा केल्याचे समोर आले होते. मात्र आता तर गुगलवर सर्च केले असताच हा फोटो दिसू लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here