फोन टॅपिंगप्रकरणी अज्ञाताविरुद्ध तक्रार! 

रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररीत्या फोन टॅप करून पोलीस बदलीच्या घोटाळ्याचा अहवाल बनवल्याचा आरोप महाविकास आघाडीचे मंत्री करत होते, प्रत्यक्षात सायबर सेलकडे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

83

राज्याच्या पोलीस खात्यात खळबळ उडवून देणारा बदली घोटाळा तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उघडकीस आणून तो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला. त्यासाठी त्यांनी फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग बेकायदेशीर केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केला, मात्र प्रत्यक्षात या प्रकरणी गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात केल्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांचा आरोप हा बिनबुडाचा आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकिवात येऊ लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल दिल्यावर सरकारने गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.

फडणवीसांनी उल्लेख करताच खळबळ उडाली! 

रश्मी शुक्ला यांनी पोलीस खात्यातील बदल्यांच्या घोटाळ्यावरील अहवाल कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे होता, तोवर यावर कोणतेही प्रतिक्रिया उमटली नाही. तब्बल ११ महिने हा अहवाल लाल फितीत अडकून होता, ज्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचा उल्लेख करत त्या संबंधी जे फोन टॅपिंग झाले, त्याचा डेटा असलेला पेन ड्राइव्ह फडणवीस यांनी दाखवला, तेव्हा राज्याचा राजकारणात खळबळ उडाली. याप्रकरणी महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार, एनसीपी प्रवक्ते नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र देशमुख यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर थेट आरोप केले. त्यांनी कुणालाही न कळवता बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले, असा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात येईल, असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा तो अज्ञात व्यक्तीच्या विरोधात करण्यात आला आहे.

(हेही वाचा : फोन टॅपिंग अहवालाबाबत फडणवीसांनी काय केला गौप्यस्फोट? वाचा… )

सायबर सेलकडे केली तक्रार!

मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे राज्य गुप्त वार्ता विभाग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केल्या प्रकरणी कलम ३० भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३(ब),६६ सह ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट १९२३अंतर्गत कलम ५ अनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.