शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले तरी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारांच्या तारखांवर तारखा दिल्या जात आहे. मात्र दुसऱ्याबाजूला मंत्रिमंडळा विस्तारांबाबत भाजपाच्या गोटात शांतता दिसत आहे. याचे कारण आता समोर आले आहे. जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले मंत्री; काय जादू झाली? वाचा सविस्तर…)
सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या चर्चेला अधिक जोर धरला आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या तारखा दिल्या जात आहेत. मात्र याबाबत भाजप नेत्यांनी मौन धारण केले आहे. कारण जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत नाही, तोपर्यंत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही.
माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात. जे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. त्यामुळे जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community