जे इस्लाममध्ये (Islam) जन्मलेले नाहीत ते कमनशिबी आहेत. जे इस्लामचे अनुयायी नाहीत अशा लोकांमध्ये (हिंदू) इस्लामचा प्रसार केला पाहिजे. ज्यांचा जन्म इस्लाममध्ये झाला आहे ते स्वर्गात पोहोचतील , असे वादग्रस्त विधान पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते फरहद हकीम यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
एखाद्याला इस्लामच्या मार्गावर आणणार खरा मुसलमान
कोलकाता येथे नुकतीच एक कुराण पठण स्पर्धा पार पडली. त्यात बोलताना हकीम म्हणाले की, आपल्याला इस्लाम (Islam) न मानणाऱ्यांत इस्लामचा प्रसार करायचा आहे. आपल्याला एखाद्याला इस्लामच्या मार्गावर आणण्यात यश आले तर आपण खरे मुसलमान बनू शकतो. जेव्हा हजारो लोक टोपी घालून बसतात, तेव्हा आपली खरी ताकद दिसते. आपले ऐक्य दिसते. इस्लाम धर्मात जन्माला न आलेले लोक कमनशिबी आहेत. त्यामुळे त्यांना इस्लामचे (Islam) निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्विकारले तर ईश्वर निश्चितच आनंदी होईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर भाजपसह विविध विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले की, ‘अल्लाह’ला खूश करण्यासाठी गैर-मुसलमानांनी इस्लाम (Islam) स्वीकारण्याचा सल्ला देऊन हा ‘अंडरलाइन अजेंडा’ उघड करत आहेत. या निर्लज्ज घटना अशुभ भविष्याकडे निर्देश करतात, जिथे टीएमसीचे तुष्टीकरण धोरण अधिक तीव्र होईल आणि तो दिवस दूर नाही जेव्हा पश्चिम बंगाल ‘दीदींच्या प्रेरणेने’ पूर्णपणे ‘मुस्लिम राष्ट्र’ मध्ये बदलेल, असे म्हटले.
Join Our WhatsApp Community