Unmesh Patil : उन्मेश पाटलांचा उबाठा गटात प्रवेश; उबाठा गटाकडून निवडणूक लढणार ?

257
Unmesh Patil : उन्मेश पाटलांचा उबाठा गटात प्रवेश; उबाठा गटाकडून निवडणूक लढणार ?
Unmesh Patil : उन्मेश पाटलांचा उबाठा गटात प्रवेश; उबाठा गटाकडून निवडणूक लढणार ?

Unmesh Patil : उन्मेश पाटलांचा उबाठा गटात प्रवेश; उबाठा गटाकडून निवडणूक लढणार ?

भाजपचे जळगावचे (Jalgaon)खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) हे उबाठा गटात प्रवेश करणार आहेत. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उन्मेश पाटील (Unmesh Patil) निवडणूक लढवणार आहेत. उन्मेश पाटील 3 एप्रिल रोजी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करतील. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पाटील उबाठा गटात प्रवेश करणार आहेत. या वेळी ते शिवबंधन हाती बांधतील. काही दिवसांपूर्वी पाटील यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली होती. (Unmesh Patil)

(हेही वाचा- Naxal Attack: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, आठ नक्षलवादी ठार)

भाजपने जळगावमधून (Jalgaon)स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. यामुळे उन्मेश पाटील (Unmesh Patil) नाराज होते. विद्यमान खासदार असताना पक्षाने तिकीट नाकारल्याने उन्मेश पाटील (Unmesh Patil) नाराज झाले. उन्मेश पाटील हे आता जळगाव लोकसभेसाठी उबाठा (Uddhav Thackeray)गटाकडून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार आहेत.

नेमकं काय म्हणाले उन्मेश पाटील ?

संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर उन्मेश पाटील (Unmesh Patil)यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, “यावर मी नंतर माध्यमांशी बोलेन. आता माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही. मी उद्या सकाळी तुमच्यासाठी बोलेन. मी तुमचा सगळ्यांचा आदर करतो पण मी तुमच्याशी नंतर बोलेन. मी आणि संजय राऊत साहेब मागच्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकत्र संसदेत होतो. आमची चांगली मैत्री आहे. काही गोष्टी राजकारण पलीकडे असतात. ही भेट तशीच होती”, असं ते म्हणाले. (Unmesh Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.