सततचा पाऊस आता ‘नैसर्गिक आपत्ती’; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

168

अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झाला असताना, राज्य शासनाने त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

( हेही वाचा : प्रवाशाने अडवला लोकल ट्रेनचा दरवाजा, संतप्त नागरिकांनी केली लाथाबुक्यांनी मारहाण! नेमके काय घडले, पहा व्हायरल व्हिडिओ)

मंत्रालयात बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सुधारित रेती धोरणास मान्यता देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली. या माध्यमातून ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे.

देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिवाय सेलर इन्स्टीट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरणास मान्यता देण्यात आली.

कॅबिनेटमधील महत्त्वाचे निर्णय

  • अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार
  • महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी देणार
  • अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
  • नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना आणणार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.