उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची जी धावपळ सुरु आहे, ती शिवसेना वाचवण्यासाठी केलेली धावपळ नसून मुंबई महानगरपालिका ठाकरेंकडे राहावी यासाठी केलेली धावपळ आहे. त्याचबरोबर ठाकरेंना आदित्य ठाकरेंचं राजकीय करिअर वाचवायचं आहे. ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत, आदित्य हे बाळासाहेबांचे नातू आहेत. त्यांना वाटतं की मुंबई ही आपली आहे, महाराष्ट्र हा आपला आहे. आपला म्हणजे आपल्या मालकीचा. म्हणून तर त्यांच्यावर कुणी टिका केली तर त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान झाला. ही या पिता-पुत्रांची मानसिकता आहे.
पालिका म्हणजे ठाकरेंचा प्राण
आता या पार्श्वभूमीवर शिंदेंकडे अनेक लोक येत आहेत. ठाण्यातला एक नगरसेवक सोडल्यास सगळे नगरसेवक शिंदे गटाला येऊन मिळालेले आहेत. यापुढे ठाकरेंना आणखी मोठे दक्के सहन करावे लागणार आहे. आता ठाकरेंना सर्वात अधिक प्रिय असलेल्य मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर लागण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत ठाकरेंना पालिका जिंकायचीच आहे. कारण पालिका म्हणजे ठाकरेंचा प्राण…
ही झाली एक बाजू. आता दुसर्या बाजूचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पालिका निवडणुकीआधी शिंदेंनी केलेला उठाव हा बोलका आहे. मी आधीपासून सांगत होतो की सत्तापालट करणं हा एकमेव उद्देश या उठावातून दिसून येत नाही. शिंदेंना ठाकरेमुक्त शिवसेना करायची आहे. आणि याची तयारी महानगरपालिकेपासून होणार आहे. आता ठाण्यातील नगरसेवकांनी केलेला उठाव या दृष्टीने खूपच बोलका आहे. भाजपाने शिंदेंना मुख्यमंत्री केलेलं आहे. मागच्या वेळी ठाकरे नाराज होऊ नये म्हणून भाजपाने पालिकेत सत्ता स्थापन केली नव्हती. यावेळी मात्र भाजपा बहुमताने निवडून येईल. शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांची युती ठाणे आणि मुंबईत सत्ता स्थापन करेल.
( हेही वाचा : शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र? त्यापेक्षा ठाकरेंनीच प्रतिज्ञापत्र द्यायला हवं)
पण ठाण्यामध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि मुंबईत भाजपाचा महापौर बसेल असा अलिखित करार शिंदे-फडणविसांमध्ये झालेला असणार. अजून राज ठाकरे पूर्ण ताकदीने समोर आलेले नाही. शिवसेनेला धक्का देण्यासाठी राज ठाकरे देखील सज्ज आहेत. पुढे उद्धव ठाकरेंकडे असलेले निष्ठावान राज ठाकरेंकडे जाऊ शकतात. त्यामुळे यावेळी ठाकरेंना ३५-४० नगरसेवकांचा टप्पा गाठता येईल की नाही यावरही मला शंका व्यक्त घ्याविशी वाटते.
Join Our WhatsApp Community