Uttar Pradesh मध्ये पोटनिवडणुकीत हिंसाचार; मीरापुरमध्ये दगडफेक तर कुंदरकीत सपा उमेदवारांची पोलिसांनी धक्काबुक्की

29
Uttar Pradesh मध्ये पोटनिवडणुकीत हिंसाचार; मीरापुरमध्ये दगडफेक तर कुंदरकीत सपा उमेदवारांची पोलिसांनी धक्काबुक्की
Uttar Pradesh मध्ये पोटनिवडणुकीत हिंसाचार; मीरापुरमध्ये दगडफेक तर कुंदरकीत सपा उमेदवारांची पोलिसांनी धक्काबुक्की

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ९ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुक दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत फूलपूर, गाझियाबाद, मझवा, खैर, मीरापुर, सीसामऊ, कटेहरी, करहल आणि कुंदरकी या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यातच मुजफ्फरनगरमधील मीरापुर मतदारसंघात दगडफेकीची घटना घडली. समाजवादी पार्टीच्या सुंबुल राणा यांच्या समर्थकांवर हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मुरादाबादमधील कुंदरकी विधानसभा मतदारसंघात सपा उमेदवार हाजी रिझवान मतदानादरम्यान पोलिसांशी वाद झाले. त्यांनी सुरक्षेसाठी लावलेले बैरीगेट हटवण्यात आले आहे. (Uttar Pradesh)

( हेही वाचा : Delhi Air Pollution : सरकारी कर्मचारी करणार वर्क फ्रॉम होम

मुजफ्फरनगरच्या मीरापुरमध्ये (Meerapur Assembly constituency) बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार कादिर राणा यांची सून सुंबुल राणा सपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सुरु होताच ककरौी परिसरात सपा समर्थकांनी मतदान केंद्रात हेराफेरी झाल्याचे आरोप केले. दरम्यान घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळत घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना सजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी सुंबुल राणा समर्थकांकडून मारहाण सुरु झाली. तसेच समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. (Uttar Pradesh)

मुरादाबादच्या कुंदरकीमध्येही (Kundarki) गोंधळ उडाला. समाजवादी पक्षाचे उमेदवार हाजी रिझवान पोलिसांशी धक्काबुक्की करताना दिसले. सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड पाहून हाजी रिझवान संतापले. त्यांनी घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांवर आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी समजावल्यानंतर ही रिझवानने हाताने बॅरिकेड काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळी महिला पोलिसही तैनात करण्यात आले होते. कुणाचे ओळखपत्र तपासण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, असा सवालही हाजींचे समर्थक पोलिसांना करत होते.(Uttar Pradesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.