अयोध्येतील चौकाला लता दीदींचे नाव

जयंतीनिमित्त गानसरस्वतीला अभिवादन

102

गानसरस्वती म्हणून लोकप्रिय असलेल्या गायिका दिवंगत लता मंगेशकर यांच्या मरणोपरांत पहिल्या जयंतीला अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात आले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या चौकाचे लोकार्पण केले. याठिकाणी 14 टन वजनाची 40 फूट वीणेचा पुतळा बसवण्यात आला आहे.

यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या जयंती दिनी अभिवादनपर ट्विट केले आहे, आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले की, लतादीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. मला खूप काही आठवतंय…असंख्य संभाषणे ज्यात त्यांनी खूप आपुलकीचा वर्षाव केला. आज अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे. महान भारतीय व्यक्तिमत्वाला खरी श्रद्धांजली आहे. यासोबतच योगी आदित्यनाथ यांनी देखील स्व. लता मंगेशकर यांचे स्मरण केले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आजच पंजाबमधील विमानतळाला शहीद सरदार भगत सिंग यांचे नाव देण्यात आलेय. योगायोगाने आज, शहीद भगत सिंग आणि लता दीदी दोघांची जयंती आहे. आपला देश, समाज, संस्कृती, जीवनमूल्ये यासाठी योगदान देणाऱ्या विभूतींचे स्मरण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे भारतीय सांस्कृतिक क्षेत्राला आपल्या स्वर्गीय स्वरातून समृद्ध करणाऱ्या लतादीदींच्या जयंतीनिमित्त अयोध्येतील या चौरस्त्याला त्यांचे नाव दिले जातेय. याद्वारे येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे अलौकिक योगदान कायम स्मरणात राहिल असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.