योगींच्या हेलिकॉप्टरचं वाराणसीत Emergency लँडिंग, हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक

65

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचं रविवारी वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या हेलिकॉप्टरला एका पक्ष्यानं धडक दिल्यानंतर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तर सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे रविवारी वाराणसी येथील पोलीस लाईन येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच एक पक्षी हेलिकॉप्टरला धडकल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. दरम्यान, मुख्यमंत्री सुखरूप उतरताच प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला, अशी माहिती जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली.

(हेही वाचा – बंडखोरांमध्येच बंडखोरी होणार! हिंमत असेल तर…, राऊतांनी दिलं चॅलेंज)

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर मुख्यमंत्री पोलीस लाईन येथून सर्किट हाऊसमध्ये परतले. उड्डाण करताना पक्षी हेलिकॉप्टरला आदळला. त्यामुळे योगींचे काळजीपूर्वक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर राज्याचे विमान बोलावण्यात आले असून बाबतपूर विमानतळावरून मुख्यमंत्री लखनौला रवाना होणार आहे.

काय घडला प्रकार

मुख्यमंत्री योगी हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले होते. सर्किट हाऊस येथे विकासकामांचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै महिन्यात होणाऱ्या प्रस्तावित दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेतला. सायंकाळी उशिरा कालभैरव व बाबा विश्वनाथ यांचेही दर्शन घेतले. सर्किट हाऊसमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा सकाळी पोलीस लाइन मैदानावर पोहोचला आणि तेथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. हेलिकॉप्टर सुमारे 550 फूट उंचीवर पोहोचल्यावर अचानक एका पक्ष्याची हेलिकॉप्टरला टक्कर दिली. पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर काळजीपूर्वक पोलीस लाइन मैदानावर उतरवले. हा प्रकार पाहून पोलीस व प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.