लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) भाषणांद्वारे कॉंग्रेसवर (Congress) जोरदार टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आणखी एक वार केला आहे. सरकारने लोकसभेत युपीए सरकारची श्वेतपत्रिका सादर केली आहे. (UPA vs NDA) काँग्रेसच्या सरकारकाळातील आर्थिक गैरव्यवहारांच्या विरोधात ही श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. एनडीए सरकारच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्वेतपत्रिका सादर केली.
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा जातीवाचक उल्लेख)
१० वर्षांचा आर्थिक लेखाजोखा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वीच अशा प्रकारची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे सांगितले होते. या श्वेतपत्रिकेत यूपीए सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ आणि एनडीए सराकरचा १० वर्षांचा कार्यकाळ यांचा आर्थिक लेखाजोखा मांडण्यात आला.
यूपीएच्या काळात रुपयाच्या मूल्यात घसरण
या श्वेतपत्रिकेमध्ये युपीए सरकारच्या काळातील आर्थिक गैरव्यवहार मांडण्यात आले आहेत. यूपीए सरकारने देशाचा आर्थिक पाया कमकुवत केल्याचे या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. यूपीएच्या काळात रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली. बँकिंग क्षेत्र संकटात होते, परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली होती, मोठे कर्ज घेतले होते, असा ठपका या श्वेतपत्रिकेत ठेवण्यात आला आहे. २०१४ साली संकटाची परिस्थिती होती. अर्थव्यवस्थेची टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि प्रशासन यंत्रणा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी मोठी होती, असे सरकारने श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. (UPA vs NDA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community