Update : Grampanchayat Results: ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी – २०२३

99
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी - २०२३ 
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी - २०२३ 

राज्यभर २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Results) रविवार ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. २ हजार ९५० सदस्य पदे आणि १३० सरपंचाच्या रिक्त पदांसाठीही ही पोटनिवडणूक झाली. त्याची आज म्हणजेच सोमवार ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे, तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी (७ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा कोल आज स्पष्ट होणार आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची मतमोजणी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

2.30 वाजेपर्यंतची निकालाची आकडेवारी

भाजप        शिंदे        ठाकरे        काँग्रेस      शरद पवार गट      अजित पवार गट    इतर     एकूण

570        252        91            202          96                      338          291      2950

नाशिक जिल्ह्यात मनसेने खाते उघडले

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेने खाते उघडले आहे. नाशिकमध्ये जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. संगीता कैलास गायकवाड 558 मते मिळवीत थेट सरपंचपदी विजय मिळवला आहे. विरोधी शिवसेना ठाकरे गटाच्या सीमा भाऊसाहेब पागेरे यांना 394 मते मिळाली आहेत.

महत्वाच्या घडामोडी

  • बुलढाण्यात ग्रामपंचायतीचे निकाल संमिश्र; आमदार संजय कुटेंना मोठा धक्का
  • अकोल्यात संमिश्र कौल, वंचितला अपेक्षित यश नाही
  • सिंधुदुर्गात भाजपाचा केसरकरांना मोठा धक्का
  • इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीवर भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निर्विवाद सत्ता
  • कर्जत जामखेड मतदारसंघातील नऊ जागांपैकी पाच जागांवर राम शिंदे यांची सत्ता
  • परळी मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना धक्का
  • बोदवड तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीवर शरद पवार गटाचा झेंडा
  • जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव

(हेही वाचा Grampanchayat Results: ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी – २०२३ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.