नाराज Chhagan Bhujbal ‘थर्टी फर्स्ट’साठी परदेशवारीवर?

84
नाराज Chhagan Bhujbal 'थर्टी फर्स्ट'साठी परदेशवारीवर?
  • सुजित महामुलकर

मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) दुबई, केनिया, मोरोक्को आणि कतार अशा परदेशवारीवर जाण्याची परवानगी न्यायालयाकडून घेतली आणि रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मंत्रिमंडळात डावलले

फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबर 2024 या दिवशी आणि या सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राज भवनच्या हिरवळीवर झाला. या मंत्रिमंडळात भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश न करता त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भुजबळ यांनी सभागृहात हजेरी लावली. त्या दिवशी पक्ष प्रमुख अजित पवार यांनी दांडी मारली.

नाराजी पवारांवर, भेट फडणविसांची

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मनातील खदखद ऐकायला अजित पवार हे विधिमंडळ परिसरार उपलब्ध नसल्याने भुजबळ यांनी ही खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली. ७७ वर्षीय भुजबळ यांनी नागपूर सोडण्यापूर्वी अजित पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. ‘जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना,’ असे सूचक विधान भुजबळ यांनी केले आणि थेट नाशिकला रवाना झाले. अधिवेशन संपल्यानंतर २३ डिसेंबर २०२४ या दिवशी भुजबळ यांनी अजित पवार यांची भेट न घेता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

(हेही वाचा – Air Pollution : बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील विकासकामे बंद! वरळी, कुलाबा नेव्ही नगर रडारवर)

फडणविसांचा सल्ला; १०-१२ दिवस थांबा

फडणवीस यांच्या भेटीनंतर भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले की, फडणवीस यांनी १०-१२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही दिवसात बीड प्रकरणावरून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असताना छगन भुजबळ न्यूज चॅनलवरही दिसत नाहीत.

‘मनी लॉन्ड्रिंग’मुळे परवानगीची गरज

छगन भुजबळ हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील संशयित आरोपी असल्याने त्यांना परदेशवारीसाठी न्यायालयांच्या परवानगीची आवशयकता लागते. त्याशिवाय भुजबळ देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. यामुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वकिलाने विशेष न्यायालयात २० डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत परदेशवारी करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणारा अर्ज केला आणि विशेष न्यायालयाने त्याला परवानगीही दिली.

त्यानुसार भुजबळ यांना कुटुंबासह थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठीदुबई, मोरोक्को, केनिया आणि कतार येथे पर्यटनासाठी जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली तसेच सुट्टीवरून परतल्यानंतर ईडीला त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले न्यायालयाने दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.