भाजप MP Kangana Ranaut यांना भेटण्यासाठी द्यावे लागणार आधार कार्ड; काय म्हणाली अभिनेत्री…

161
भाजप MP Kangana Ranaut यांना भेटण्यासाठी द्यावे लागणार आधार कार्ड; काय म्हणाली अभिनेत्री...
भाजप MP Kangana Ranaut यांना भेटण्यासाठी द्यावे लागणार आधार कार्ड; काय म्हणाली अभिनेत्री...

माझं मंडी सदरमध्ये ऑफिस आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अशा परिस्थितीत भेटायला येणाऱ्या लोकांना मंडी परिसराचे आधार कार्ड सोबत आणावे लागेल. तुमच्या संसदीय कामकाजासाठी तुम्हाला जी काही अडचण असेल, ती तुम्हाला लेखी स्वरूपात आणावी लागेल, जेणेकरून लोकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. मोठ्या संख्येने लोक येथे येतात, त्यामुळे असे केले जात आहे, असे वक्तव्य भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (MP Kangana Ranaut) यांनी केले आहे. कंगना राणौत यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

(हेही वाचा – SpiceJet च्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली; कारण काय? Video व्हायरल!)

कंगना राणौत पुढे म्हणाल्या की, “तुम्ही मंडीचे असाल, तर मंडी सदर येथील कार्यालयात या. तुम्ही हिमाचलचे असाल तर कुल्लू-मनाली येथील माझ्या घरी येऊन भेटा. जर आपण एखाद्या समस्येवर एकत्र चर्चा केली, तर ती सोडवणे सोपे जाते. तसेच, संसदीय मतदारसंघाशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही केंद्राशी संपर्क साधू शकता. राष्ट्रहिताशी निगडीत काही बाब आहे असे वाटत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमचा आवाज आहोत आणि लोकसभेत आवाज उठवू.”

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात कंगना राणौत हिच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत कंगना राणौत (MP Kangana Ranaut) यांना ५,३७,०२२ मते मिळाली, तर विक्रमादित्य सिंह यांना ४,६२,२६७ मते मिळाली आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.