Urban Voters : शहरी मतदारांना मतदानासाठी उतरविण्याचे राजकीय पक्षांसमोर आव्हान

104
Urban Voters : शहरी मतदारांना मतदानासाठी उतरविण्याचे राजकीय पक्षांसमोर आव्हान
  • सुजित महामुलकर

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात आणि आज सोमवारी १३ मे ला होत असलेल्या चौथ्या टप्प्याच्या मतदानात सर्वाधिक मतदान ग्रामीण भागात झाले असून तुलनेत शहरी भाग मतदानाच्या बाबतीत उदासीन असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पुढील सोमावारी २० मे रोजी मुंबईसह १३ मतदार संघात शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार असून राजकीय पक्षांसमोर मतदारांना मतदानासाठी उतरविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. (Urban Voters)

केवळ तीन जागांवर ७० टक्क्यांहून अधिक मतदान

गेल्या तीन टप्प्यात केवळ तीन मतदार संघात ७० टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक मतदान ७१.८८ टक्के गडचिरोली-चिमुर या अनुसूचित जमातीसाठी (scheduled tribe) राखीव असून कोल्हापूरमध्ये ७१.५९ टक्के आणि हातकणंगले मतदार संघात ७१.११ टक्के मतदान झाले आहे. आजही १३ मे ला होणाऱ्या ११ पैकी नंदुरबार या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघात ५ वाजेपर्यंत ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. शेवटच्या एक तासात ७० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Urban Voters)

(हेही वाचा – Rain in Mumbai : मुंबईत वादळी पावसाने दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले; १०० जण अडकले)

उपराजधानीत कमी मतदान

या तुलनेत पहिल्या तीन टप्प्यात शहरीकरण होत असलेल्या रायगड मतदार संघात ५५.५१ टक्के, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ५४.३० टक्के तसेच बारामती आणि सोलापूर मतदार संघांत ६० टक्क्याच्या जवळपास मतदान झाले आहे. चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया मतदार संघांमध्ये अनुक्रमे ६७.५८ टक्के आणि ६७.०४ टक्के मतदान झाले आह तर उर्वरित सर्व मतदार संघांमध्ये पहिल्या तीन टप्प्यांत ६० ते ६५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. (Urban Voters)

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मतदान, खरे आव्हान

राजकीय पक्षांची खरी परीक्षा पुढच्या सोमवारी, २० मे ला शेवटच्या टप्प्यात होणार आहे. या टप्प्यात उर्वरित १३ मतदार संघांमध्ये मतदान होणार असून मुंबईतील सहा मतदार संघ तसेच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि नाशिक या शहरी भागाचा समावेश आहे. मतदान सोमवारी म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर होणार असून मतदान कमी होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, पालघर तसेच दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघाचाही याच शेवटच्या टप्प्यात समावेश आहे. (Urban Voters)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.