कर्नाटकमधील (Karnataka Congress) सिद्धरामय्या सरकारने अंगणवाडी शिक्षक पदासाठीच्या भरतीसाठी इतर काही नियमित निकषांप्रमाणेच उर्दू सक्तीची करण्याचा निकष समाविष्ट करण्याबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. त्यानुसार जीआरदेखील काढण्यात आला आहे. मुस्लीम समुदायाचं लांगुलचालन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं भाजपाकडून (BJP) म्हटलं जात आहे. कर्नाटकच्या चिकमंगळुरू व मुदीगरे जिल्ह्यात अंगणवाडी शिक्षिका भरतीसाठी हा जीआर काढण्यात आला आहे.
शिक्षण विभागाचं उपसंचालकांना पत्र
या जीआरबाबत कर्नाटकच्या (Karnataka Congress) शिक्षण विभागानं उपसंचालकांना पत्र पाठवलं आहे. त्यामध्ये उर्दू भाषिक लोकसंख्येच्या प्रमाणाबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. भरती चालू असणाऱ्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या समुदायांचे लोक राहात असून त्यात मुस्लीम समुदायाचं प्रमाण ३१.९४ टक्के इतकं आहे. सरकारच्या जीआरनुसार जिथे २५ टक्क्यांपेक्षा अधिक अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या असेल, तिथे कन्नड भाषेसह अल्पसंख्याक समाजाच्या भाषेची अट असायला हवी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, आता राज्य सरकारचा निर्णय हा कन्नड भाषिक उमेदवारांना बाजूला सारण्यासाठीच घेतला जात असल्याचं म्हटलं जात आहे.
ಅಂಗನವಾಡಿ ಶಿಕ್ಷಕಿ ಕೆಲಸ ಸಿಗಬೇಕಾದರೆ ಉರ್ದು ಭಾಷೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು ಎಂಬ ರಾಜ್ಯದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರಕಾರದ ಘೋಷಣೆ ಖಂಡನೀಯ.
ಅಂಗನವಾಡಿ ಶಿಕ್ಷಕರ ನೇಮಕಾತಿಯಲ್ಲಿಯೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯವನ್ನು ಒಲೈಸುವ, ಅವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಕೆಲಸ ಸಿಗುವಂತೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಡುವ ಹಿಂಬಾಗಿಲ ಯತ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರ ಕುಟಿಲ ನೀತಿ ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತಿದೆ.
ಅಸಹ್ಯ… pic.twitter.com/M6Ry24dOr3
— Nalinkumar Kateel (@nalinkateel) September 23, 2024
कर्नाटकमधील भाजपाचे खासदार नलिनकुमार कटील (Nalin Kumar Katil) यांनी यासंदर्भात केलेल्या एक्स पोस्टमध्ये याबाबत भाष्य केलं आहे. “अंगणवाडी शिक्षक पदासाठी उर्दू भाषा यायला हवी, अशी सक्ती करणारी काँग्रेस सरकारची घोषणा निषेधार्ह आहे. मुस्लीम समुदायाचं छुपं लांगुलचालन करण्याचा हा प्रयत्न आहे. अंगणवाडी शिक्षक भरतीमध्ये फक्त त्यांनाच नोकऱ्या मिळाव्यात यासाठीचा हा प्रयत्न म्हणजे काँग्रेसच्या ओंगळवाण्या राजकारणाची परिसीमा आहे. कर्नाटक सरकार कन्नड भाषिक भागामध्ये उर्दू भाषेची सक्ती करत आहे. कन्नड भाषेपेक्षा उर्दूला प्राधान्य का दिलं जात आहे? याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्री लक्ष्मी हेबबाळकर यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे.” असं म्हटलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community