बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणाकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात – Satyajeet Tambe

78
बांगलादेश मधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास (Chinmoy Krishna Das Prabhu) यांना बांगलादेश सरकारने (Bangladesh Govt) अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत असून यामुळे बांगलादेश (bangladesh hindu conflict) मधील हिंदू सह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहे. तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास (Chinmoy Krishna Das Prabhu) यांच्या सुटकेबरोबर बांगलादेश मधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. (Satyajeet Tambe)
युवक आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश मधील आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना तेथील सरकार ने अत्यंत अन्याय कारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांना तुरुंगात टाकले आहे. यामुळे केवळ त्यांच्या अनुयायींना त्रास झाला नाही तर बांगलादेश मधील समस्त हिंदू बांधवांच्या सुरक्षिततेबद्दल आणि कल्याणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. एक सहकारी माणूस आणि धार्मिक सहिष्णुता आणि मानवी हक्कांना महत्त्व देणारा राज्याचा नेता या नात्याने आपणास विनंती आहे की, आपण भारत व बांगलादेश सरकार मधील उच्च अधिकाऱ्यांना तातडीने पत्र लिहून व योग्य राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेश मधील हिंदू समाजाला मानवतावादी मदत आणि समर्थन देण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा. हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मानवता हाच धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे.
(हेही वाचा – godrej bkc mumbai : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सबद्दल ह्या अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?)
बांगलादेशमध्ये मात्र जाणीवपूर्वक कट्टरतावाद वाढवून राजकारणासाठी हिंदू धर्मियांना त्रास दिला जात आहे. यामुळे तेथील हिंदू धर्मीय असुरक्षित झाले आहेत. कट्टरतावादी अनेक नेते बेताल वक्तव्य करून हिंदू धर्मा विरोधी चिथावनी देत आहे. यामुळे अनेक ठिकाणी हिंदू बांधवांवर हल्ले होत आहेत. यामुळे तेथील हिंदू बांधव-महिला अत्यंत भयभीत वातावरणात आहेत. आपण तातडीने राजनैतिक पातळीवरून या प्रकरणात हस्तक्षेप करून बांगलादेश मधील आध्यात्मिक धर्मगुरू चिन्मय कृष्णदास (Chinmoy Krishna Das Prabhu) यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदू धर्मीयांचा छळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या वतीने तातडीने पुढाकार घेऊन तेथील हिंदू समाजाला सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपाययोजना करून तेथील हिंदू धर्मियांना दिलासा द्यावा ही विनंती आहे. आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी यांनी बांगलादेश मधील हिंदू धर्मीयांच्या रक्षणाकरता मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीबद्दल समस्त हिंदू बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.